Tuesday, January 08, 2008

उद्या देखील मी आनंदीच असेन!

उद्या देखील मी आनंदीच असेन
जेव्हा दिवस होईल छोटा व गारठा असेल बोचरा
तेव्हा मग माझ्या हूळहूळणाऱ्या नाकाच्या शेंड्यानिशी
स्वत:ला उबदार कपड्यात लपेटून असेन मग्न माझ्या कामात


मला माहीत आहे मी आनंदीच असेन तेव्हांही
कारण तेंव्हा सूर्य मला त्याची थोडीशी,उबदार किरणे
नक्कीच उधार देईल,मला किंचित उबदार करायला



मला हे देखील माहीत आहे कि आता फक्त काही अंतरावर

आहे माझा आनंद,मग मी असेनच ना मनस्वी
त्या सब वे मधल्या आनंदयात्री गिटार वादकासारखी.



उद्या मी आनंदी असेनच
जरी आजची ही सकाळ जमून आली असली तरी
जी माझा आजचा दिवस देखील जमवून आणणार असली तरी!



आता जरी हिमकणांनी अंगण भरल असल तरी,
हिरवळी वरचे दवबिंदू मला अनवाणी फिरण्याचे आमंत्रण देत असले तरी,
या गारठ्यात ओव्हन मधल्या ब्लू बेरी मफिन्स खुणावत असल्या तरी,
ह्या शांत समाधिस्त क्षणांची शांतता चिरंतन वाटली तरी,
आता या क्षणी सगळच अगदी मस्त जमून आल असल तरी,

माझा आनंद मी थोडासा पुढे ढकलणार आहे,उद्यापर्यंत!


मला माहीत आहे कि उजाडणारा प्रत्येक दिवस
कालच्या दिवसावर आलेले किंचितसे झाकोळ
दूर करतच असतो.


आजच्या पेक्षा येणारा उद्या मला अजूनी प्रफुल्लीत करणार आहे.
काल पर्यत पडलेल्या गहन प्रश्नांची उत्तर मला "उद्या"च देणार आहे
म्हणूनच मी उद्या देखील आनंदीच होणार आहे.



(मूळ कवीता Happy Tomarrow -सई केसकर लिंक-http://www.saeekeskar.blogspot.com/)