छोट्या छोट्या आठवणी इवल्याश्या पायांच्या,
निरागस हळूवार
नुकत्याच पडलेल्या दवबिंदूंच्या,
जे वाहून जाण्यास ठाम नाकारतात,
व लहानग्याच्या हट्टासारखे पानाफूलावर बसून रहातात.
किंवा मग ऎटदार,फूगीर,कट्यावरच्या मनिमाऊच्या
जी तृणदवांनी भिजलेले आपले गुलाबी तळ्वे,
झूपकेदार मिशातून अलगद बाहेर आलेल्या इवल्याश्या जिभेने चाटता चाटता बघत असते
तुमच्या डोळ्यातील अनावर कूतूहल
तिच्या गर्द हिरव्या पाचूदार डोळ्यांनी.
किंवा मग बागेत नकळत फुलणाऱ्या फूलांनी,
नकळत वेधलेले तूमचे लक्ष
आणि मग फुलावरील दवबिंदू आपल्या ओंजळीत घेण्याची उत्स्फूर्तता दाटून आलेली.
कधी कधी कूणीतरी हळूच आपल्या नकळत
आपल्यासाठी ठेवलेल्या चाँकलेट्सची.
तर कधी मेल मधून पाठवलेल्या आपल्या आवडत्या गाण्याची ज्यामुळे मग हात नकळत वळतात तीच धून प्रामाणिकपणे वाजवण्यासाठी आपल्या गिटारकडे.
त्तर कधी मैत्रीचे क्षण साठवणाऱ्या एकांती शांततेचे
जीवनाच्या या गाण्यातील लयबध्दता राखतात
याच छोट्या छोट्या आठवणी.
(सई च्या हारमनी या कवितेच मुक्त भाषांतर . मुळ कवितेची लिंक http://saeekeskar.blogspot.com/)
The Canary Song
6 years ago
No comments:
Post a Comment