Thursday, October 02, 2008

नसतेस घरी तू जेव्हा

नसतेस घ्ररी तू जेव्हा जीव तूटका तूटका होतो
जीवनाचे विरती घागे,संसार फाटका होतो

सलीलचे हे शब्द स्वर काळजाला एकदम भिडतात.
आपली प्रिया आपल्या जवळ नाही तेव्हा कस वाटत हे शब्दात सांगण तस अवघडच!
पण संदिप-सलील ने हि भावना शब्दात स्वरात ज्या प्रकारे व्यक्त केली आहे त्याला तोड नाही.
ती जवळ असते तेव्हा घराला एक वेगळ व्यक्तिमत्व असत. घरातल्या प्रत्येक वस्तूला तिच्या असण्याच भान असत. आँफिस मधून घरी आल्यावर एकत्र चहा पिताना चहाला पण वेगळाच स्वाद असतो.
दिवसभर झालेली वणवण घरात येता क्षणी संपलेली असते.

सकाळीआँफिसची वेळ साधताना होणारी लगबग,घाई गर्दी पळापळ घरातील वातावरण चैतन्यमयी करुन टाकते. सुट्टीच्या दिवशी दोघांनी मिळून पार पाडलेली आठवद्याची कामे,चहा पीता पीता निंवांतपणे वाचलेला पेपर किंवा मग फालतू कारणा वरून झालेले वादविवाद,भांडणे,रुसवे फूगवे!
ह्या सगळ्यातील मजा काय आहे ते कळण्यासाठी तीच नसण मह्त्वाच असत! ती असताना तीच असण कस जाणवणार कारण आपण ते प्रत्यक्ष अनुभवत असतो. ते असताना दिवस कधी उगवतो व कधी संपतो ते कळतच नाही.दिवसभर तीच अस्तित्व आपल्या भोवती भोवती घुटमळत असत. अगदी पायात पायात येणारया मांजरी सारख! दिवस्भर ती प्रत्यक्ष आपल्या बरोबर नसली तरी संध्याकाळी ती भेटणारच असते त्यामुळे तेव्हा देखील तीच अस्तित्व आपल्या भोवतीच असत.
हे अस तीच असण इतक सवयीच होत कि ते मग गृहितच धरल जात. श्वासा सारख होत. सतत जवळ असणार, त्याच्याशिवाय जगू न शकणार!

मग जेव्हा ती खरोखर लांब जाते तेव्हा मग तिच्या असण्याच महत्व जाणवत.

"नभ भांडून वीज पडावी,कल्लोळ तसा ऒढवतो
ही धरा दिशाहीन होते,अन चंद्र पोरका होतो

हे अचानक कोसळलेल संकट आपल्याला दिशाहीन करून टाकत अगदी पोरक करून टाकत.घरातल्या सगळ्या वस्तूवर सजीव व निर्जीव ,मरगळ पसरुन रहाते.सकाळच कोवळ उन खर तर नेहमी उत्साहीत करत पण आज तस नसत.

"येतात उन्हे दाराशी,हिरमूसून जाती मागे
खिडकीशी थबकून वारा,तव गंधावाचून जातो.

आता तिच अस्तितवच जवळपास नसल्यामूळे फक्त त्या अस्तितवाच्या आठवणीच असतात.श्वासच थांबल्या सारख होत.

" तव मिठीत विरघळणारया,मज स्मरती लाघव वेळा
श्वासाविन -हदय अडावे,मी तसाच अगतिक होतो

तिच नसण फक्त मलाच नाही तर आख्या घराला जाणवत असत. सगळ घरच उदासवाण झालेल असत.
देवासमोरची समई जी नेहमी आनंददायी शांततेत असते ती देखील उदासवाणी शांत असते.

"तू सांग सखे मज काय, मी सांगू या घरदारा
समईचा जीव उदास,माझ्यासह मिणमिण तूटतो."

तिच अस अस्तित्व जाणवण्यासाठी वयाची अट नाही. ते कधीही जाणवत. तरल तारुण्यात,सजग प्रौढत्वात किंवा मग मुरलेल्या वार्धक्यात!

"ना अजून झालो मोठा,ना स्वतंत्र अजूनी झालो
तूज वाचून उमगत जावे,तूज वाचून जन्मच अडतो"

वयाची अट नाही पण हे जाणवण्यासाठी एक अट मात्र आहे
तिच्यावर उत्कटतेने प्रेम करण्याची.

Tuesday, January 08, 2008

उद्या देखील मी आनंदीच असेन!

उद्या देखील मी आनंदीच असेन
जेव्हा दिवस होईल छोटा व गारठा असेल बोचरा
तेव्हा मग माझ्या हूळहूळणाऱ्या नाकाच्या शेंड्यानिशी
स्वत:ला उबदार कपड्यात लपेटून असेन मग्न माझ्या कामात


मला माहीत आहे मी आनंदीच असेन तेव्हांही
कारण तेंव्हा सूर्य मला त्याची थोडीशी,उबदार किरणे
नक्कीच उधार देईल,मला किंचित उबदार करायला



मला हे देखील माहीत आहे कि आता फक्त काही अंतरावर

आहे माझा आनंद,मग मी असेनच ना मनस्वी
त्या सब वे मधल्या आनंदयात्री गिटार वादकासारखी.



उद्या मी आनंदी असेनच
जरी आजची ही सकाळ जमून आली असली तरी
जी माझा आजचा दिवस देखील जमवून आणणार असली तरी!



आता जरी हिमकणांनी अंगण भरल असल तरी,
हिरवळी वरचे दवबिंदू मला अनवाणी फिरण्याचे आमंत्रण देत असले तरी,
या गारठ्यात ओव्हन मधल्या ब्लू बेरी मफिन्स खुणावत असल्या तरी,
ह्या शांत समाधिस्त क्षणांची शांतता चिरंतन वाटली तरी,
आता या क्षणी सगळच अगदी मस्त जमून आल असल तरी,

माझा आनंद मी थोडासा पुढे ढकलणार आहे,उद्यापर्यंत!


मला माहीत आहे कि उजाडणारा प्रत्येक दिवस
कालच्या दिवसावर आलेले किंचितसे झाकोळ
दूर करतच असतो.


आजच्या पेक्षा येणारा उद्या मला अजूनी प्रफुल्लीत करणार आहे.
काल पर्यत पडलेल्या गहन प्रश्नांची उत्तर मला "उद्या"च देणार आहे
म्हणूनच मी उद्या देखील आनंदीच होणार आहे.



(मूळ कवीता Happy Tomarrow -सई केसकर लिंक-http://www.saeekeskar.blogspot.com/)